द.ग.तटकरे महाविद्यालयात ‘आजचा युवक आणि आरोग्य’ विद्यार्थी संवाद कार्यशाळा…
तळा - किशोर पितळे :
( प्रतिनिधी)
मुंबई विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या आमच्या द. ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तारविभागाच्या वतीने,शुक्रवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “आजचा युवक आणि आरोग्य” या विषयावर विद्यार्थी संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेसाठी साधनव्यक्ती म्हणून डॉ. प्रफुल्ल इंगळे (वैद्यकीय अधिकारी) ग्रामीण रुग्णालय, तळा हे लाभले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक प्रा.डॉ. राजाराम महादेव थोरात यांनी केले. देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.कोणत्याही देशाचा विकास हा देशातील तरुण पिढीच्या निरोगी व सुदृढ आरोग्यावर अवलंबून असतो. आधुनिक युगात अनेक विद्यार्थी आपल्याआरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. निरोगी आरोग्य हीच मानवाची सर्वात मोठी संपत्तीआहे. आजचा तरुण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून सोशल मीडियाच्या मोहजालात अडकलेला दिसून येतो असे प्रास्ताविकात सांगितले. प्रमुख वक्तेडॉ. प्रफुल्ल इंगळे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वच्छता,संतुलित व सकस आहार,नियमित व्यायाम, स्वयंशिस्त,योग्य झोप, औषधांचे चांगले-वाईट परिणाम,दैनंदिन आहारामध्ये कडधान्य,हिरव्या पालेभाज्या, फळांचे महत्त्व तसेच मधुमेह, थायरॉईडचे विकार, उच्च रक्तदाब यांसारखे जीवन शैलीशी संबंधित आजार भविष्यात होऊ नयेत हि काळाची गरज आहेत्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन केले यासाठी तरुण वयात कोणती काळजी घ्यावी याबाबत देखील मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्याचे भविष्यकालीन फायदे सांगितले. या कार्यक्रमाचे निवेदन प्रा. साक्षी गायकवाड यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन प्रा. विजय चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी आणी महाविद्यालयीनविद्यार्थीमोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर व्याख्यानाचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या भावी आयुष्यात निश्चित उपयोग होईल.

Post a Comment
0 Comments