त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953
नांद :- भिवापूर तालुक्यातील खरकाडा गावात युवकांच्या खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हनुमान मंदिरालगत झुडपात मयूर शामराव विरपाते (26) याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या प्रकरणी रामदास दामाजी नेवारे (55) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पार्टीदरम्यान झाला होता वाद
प्राथभिक माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजी रामदास नेवारे यांच्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीदरम्यान मयूर व नेवारे यांच्यात वाद झाला. त्यानंतर मयूर बेपत्ता झाला होता. तो ट्रॅक्टर चालक असल्याने कामानिमित्त बाहेरगावी गेला असावा, असा अंदाज असल्याने त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली नव्हती.
पोलिसांची कारवाई
कुजकट वासाने लागला शोध
29 ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास हनुमान मंदिर परिसरात गेलेल्या नागरिकांना उप्र दुर्गधी जाणवली. परिसराची पाहणी केली असता झुडपांमध्थे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच भिवापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाची ओळख मयूर विरपाते अशी पटली.
संशयित आरोपी ताब्यात
घटनेनंतर संशयित रामदास नेवारे हा चिमूर तालुक्यातील सासरवाडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर चिमूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत भिवापूर पोलिसांना माहिती दिली.
भिवापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास याला पोलिसांच्या स्वाधीन केले
ठाणेदार स्वींद्र असकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
फोटो: हनुमान मंदिर परिसरात आढळलेला मयूर विरपाते याचा मृतदेह.
खून नेमका कशामुळे झाला, मयूरला मंदिर परिसरात कसे आणण्यात आले आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Post a Comment
0 Comments