मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
भामरागड तालुक्यातील येचली येथे दिनांक 06/08/2026 रोजी मतदान केंद्र 201 येचली अंतर्गत ग्रा. पंचायत सभागृह येचली येथे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत सर्व पक्षीय BLA, गावातील प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामस्थ यांचे विशेष ग्रामसभा यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली.
सभेमध्ये मतदार यादीतील दुबार नावे, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, मयत मतदार, अनुपस्तथित मतदार सेच मॅपिंग न झालेल्या (Uncollectable) मतदारांची पडताळणी व आवश्यक नोंदी घेण्यात आल्या. वरील सर्व ASDD मतदारांचे याद्या वाचून दाखविल्या. त्याअनुषंगाने उपस्थित सर्व पक्षीय BLA मार्फत काही मतदार नावे नोंद करण्याबाबत सूचना प्राप्त झाले. उपस्थितांना मतदार यादी शुद्धीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले व मॅपिंग न झालेले मतदार यांचे 2004 ची माहिती गोळा करण्याकरिता आवश्यक सूचना देण्यात आल्या. सोबतच साजा अंतर्गत येणारे पिक नुकसान, कर्जमाफी , सं.गा.यो योजने करिता प्रलंबित असलेल्या लाभार्थी यांना EKYC तात्काळ करण्यास सांगितले.
उपस्थित तलाठी तथा BLO येचली श्री सचिन कन्नाके, ग्रामसेवक श्री तिरुपती सल्ला, गणेश नागपूरवर, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA)
1. रमेश बंडू तलांडी भाजप
2. संजय येजुलवार काँग्रेस
3. प्रमोद सारमपल्लीवर शिवसेना
4. दिनेश येजुलवार शिवसेना
5. श्रीनिवास मदनया येजुलवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)यांनी उपस्थित दर्शविली.

Post a Comment
0 Comments