Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

एस,टी महामंडळाने चामोर्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या बसेस बाबत समस्त तक्रारीचे तात्काळ निरसन करावे - डॉ. प्रणय भाऊ खुणे , जिल्हा उपाध्यक्ष भाजपा.



प्रमोद चिंतलवार तालुका गडचिरोली प्रतिनिधी.

मो. नं. 9405133420

चामोर्शी :- चामोर्शी येथील आमदार जनसंपर्क कार्यालय कक्ष क्रमांक ( 2) येथे चामोर्शी तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी काल बस स्टॅन्ड चामोर्शी येथे विराट चक्काजाम आंदोलन केला.

व तात्काळ पोलीस विभागाचे व संबंधित अधिकारी यांच्या मध्यस्थीनंतर चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले. याची दखल गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.मिलिंद भाऊ नरोटे यांनी घेतली व आज भाजपा जिल्हा उपाध्यक्ष. प्रणय भाऊ खुणे यांना आमदार कार्यालय चामोर्शी येथे तात्काळ पाठवून संबंधित चामोर्शी तालुक्यातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांची यांचा थेट संवाद घडवून आणला व त्यांनी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक व गडचिरोली आगार व्यवस्थापक यांच्यासोबत थेट संवाद साधून सविस्तर चर्चा केली व चामोर्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांची समस्या बाबत महत्त्वाची बैठक आयोजित केले, व एसटी महामंडळ कडून आलेले शेड्युल नियंत्रक कोवे साहेब यांच्यासोबत थेट संवाद घडवून आणला व विद्यार्थ्यांच्या विविध समस्या बद्दल डॉ. प्रणय खुणे यांनी निवेदन स्वीकार केला व याबद्दल तात्काळ संबंधित विभाग नियंत्रक व आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून चामोर्शी तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या बसेस बद्दलच्या तक्रारी याचे तात्काळ निरसन करन्यात यावे असे भ्रमन ध्वनी वर आश्वासन घेतला, व चामोर्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या बसेसच्या समस्या एसटी महामंडळाने तात्काळ सोडवावे अशी मागणी केली,तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या मागणीला वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यात येईल असे आश्वासन दिले,यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, मानवाधिकार संघटन नेते भीमराव वनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद आसुटकर, कार्यालय प्रमुख विनोद किरमे,मनीषा बोधनवार,किशोर कुंडू, पलाश घरामी,तारक हलदार, तसेच स्थानिक चामोशी शहरातील शिक्षक, शिक्षिका व मुख्याध्यापक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments