Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

मंत्रालयासह वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांच्या घेतल्या भेटी; जनहिताच्या विविध प्रश्नांवर चर्चा.



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 

मुंबई : - राष्ट्रीय क्रीडा प्रशासक व विश्वविक्रम विजेते डॉ.निलेश राणे यांचा मुंबई दौरा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. राज्यातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या आणि जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देत हा दौरा करण्यात आल्याचे डॉ. राणे यांनी सांगितले.

मुंबई दौऱ्यादरम्यान डॉ. राणे यांनी मंत्रालयात जाऊन राज्याचे आरोग्यमंत्री श्री.प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. यावेळी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेताना रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध गैरसोयी व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री श्री.भरतशेठ गोगावले यांची भेट घेऊन विविध जनहिताच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

यानंतर डॉ.राणे यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा ठाणे शहराचे पोलीस आयुक्त श्री.आशुतोष डुंबरे (IPS), महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.भानुदास पालवे (IAS), विशेष सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.प्रवीण पडवळ (IPS) तसेच ठाणे शहराचे पोलीस उपायुक्त श्री.धीरज कुमार (IPS) यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्यासोबत प्रशासकीय, सामाजिक, क्रीडा व जनहिताशी निगडित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे डॉ. निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments