प्रमोद चिंतलवार तालुका गडचिरोली प्रतिनिधी.
मो. नं. 9405133420
गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष , जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे व समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे युवा नेते महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आरोग्य तपासणी शिबिरासह विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळपासूनच उत्साहपूर्ण वातावरणात झाली. शहर व तालुक्यातील विविध भागांतून नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले. रक्तदान शिबिरात एकूण ५१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवले. रक्तदात्यांमध्ये तरुणांचा विशेष सहभाग दिसून आला. अनेकांनी रक्तदान करत समाजासाठी योगदान देण्याचा अभिमान व्यक्त केला.
मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तसेच इतर आवश्यक तपासण्या करून रुग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
या उपक्रमातून समाजात सेवाभाव, एकोप्याची भावना आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रभावी संदेश पोहोचला. समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा अनेक युवकांना मिळाली. महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली अशा उपक्रमांची परंपरा पुढेही सुरू राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या प्रसंगी आमदार रामदासजी मसराम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, ऍड.दुशांत नामदेव किरसान,नगरसेवक सतीश विधाते,सौं. कुसुमताई अलाम, तालुकाध्यक्ष गडचिरोली वसंत राऊत, तालुकाध्यक्ष चामोर्शी प्रमोद भगत, अध्यक्ष देसाईगंज राजेंद्र बुल्ले,तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, तालुका अध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जीवन नाट, समशेरखान पठाण,नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, उत्तम ठाकरे, शरद पाटील ब्राह्मणवाडे, राजेश ठाकूर, परसराम टिकले, दिलीप घोडाम,विजय लाड, अनिल कोठारे,अब्दुल पंजवानी, सुशील शहा, प्रभाकर वासेकर, विकास जेंगठे, शंकरराव सालोटकर, मनोज आखाडे, देविदास देशमुख, श्याम भाऊ नन्नावरे, संदीप भैसारे, पंढरी चौके, आदित्य सूर्यवंशी, मयूर दोडके, स्वप्निल बेहेरे, विजय राऊत, सुधीर बांबोडे, पुरुषोत्तम चिंचोळकर, रमेश मानकर, नागोराव उईके, पांडुरंग घोटेकर, सुभाष भाऊ कोठारे, घेऊन मेश्राम, अनिल किरमे, मनोज बोरकर, मुन्ना सिंग चंदेल, माधवराव गावळ, कल्पनाताई नंदेश्वर, कविताताई उराडे, रीताताई गोवर्धन, कविताताई भगत, मीनल ताई चिमूरकर, मनीषाताई खेवले, विनोद कुंभारे, सुभाष कुकुडकर, अखिल गेडाम, गिरीधर तितराम, प्रभाकर तुलावी, अनिल कोठारे, भूषण भैसारे, विलास चीजगरे, संजय बुरांडे, देवाजी काटवे, कुणाल आभारे, सुधीर चौधरी, समीर कुळे, साहिल कुळमेथे, आकाश कुंभरे, पांडुरंग घोटेकर, अमर नवघडे, पवन नवघरे, विजयानंद महाराज रोडे, नदीम नाथानी, रवी मेश्राम, संजय शिंपी, ज्ञानेश्वर पोरटे, हरबाजी मोरे, रमेश कोठारे, साहिल वडेट्टीवार, गौरव एनपरेडडीवार, विपुल एलटीवार, सुधीर बांबोळे, अविनाश बांबोळे, जावेद खान, लालाजी सातपुते, साहिल कुडमेथे, आकाश कुंभरे, समीर कुडे, सुधीर चौधरी, स्वप्निल मुरस्कर, अशोक नैताम, कुणाल म्हशाखेत्री, चैतन्य उईके, योगेंद्र झंजाळ, निकेश कामीडवार,श्रीनिवास ताडपल्लीवार, वामनराव सावसागडे, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे सह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments