Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

उपलाट येथे पोषण माह वेलकम मेळावा उत्साहात




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी

7798185755


उपलाट :- एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत उपलाट–गिरीखाचपाडा येथील अंगणवाडी केंद्रात मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी ‘पोषण माह वेलकम मेळावा’ उत्साहात पार पडला.


कार्यक्रमास उपलाट ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रमिला झिरवा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ICDS सुपरवायझर गीता शैलश गोंधळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपलाट ग्रामपंचायतीअंतर्गत कार्यरत सर्व अंगणवाडी सेविका, माता तसेच अंगणवाडीतील बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


मेळाव्यात बालकांना मिळणाऱ्या पोषण आहाराचे महत्त्व, संतुलित आहार, योग्य पोषण, आरोग्य व स्वच्छता तसेच ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासाबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. पूर्वप्राथमिक शिक्षण, नियमित अंगणवाडी उपस्थिती आणि बालकांच्या विकासात पालकांचा सहभाग यांचे महत्त्वही यावेळी स्पष्ट करण्यात आले.


पालकांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अंगणवाडीच्या विविध उपक्रमांना सहकार्य करण्याचा सकारात्मक प्रतिसाद दिला. बालकांचे आरोग्यपूर्ण संगोपन आणि कुपोषणमुक्त समाज निर्मितीसाठी अंगणवाडी, पालक, ग्रामपंचायत आणि ICDS यांच्यातील समन्वय आवश्यक असल्याचा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments