Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांची राष्ट्रीय भ्रष्टाचार नियंत्रण एवंम जन कल्याण संघटन ठाणे जिल्हा मिडीया समन्व्यक पदी नियुक्ती.




ठाणेप्रतिनिधी-डाॅ.अमितकुमार गोईलकर


बदलापूर :- बदलापूर येथील जेष्ठ पत्रकार, संपादक आणि जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गुरुनाथ तिरपणकर यांची नियुक्ती भारत सरकार नीती आयोग अंकित राष्ट्रीय भ्रष्टाचार नियंत्रण आणि जन कल्याण संघटन या आस्थापनेच्या ठाणे जिल्हा मिडिया समन्व्यक पदी नियुक्ती करण्यात आली. श्री. गुरुनाथ तिरपणकर हे मुक्त पत्रकारिता तसेच अनेक वृत्तपत्र समूहांमध्ये पत्रकार  आणि उपसंपादक म्हणून कार्य करत आहेत. त्यांनी स्थापना केलेल्या जनजागृती सेवा संस्था(रजि)या सामाजिक संस्थेमार्फत असंख्य लोकोपयोगी कार्यें नेहमी सुरु असतात. मुंबई आणि कोकणातील अनेक नागरिकांसाठी त्यांचे उपक्रम नेहमीच उपयुक्त ठरत आलेले आहेत. 

त्यांच्या या सामाजिक कार्याची आवड, तळमळ, सर्वांना सोबत घेवून काम करण्याचे संघटन कौशल्य आणि त्याहूनही जास्त मूल्य असलेला प्रामाणिकपणा या  सगळ्या गुणांचा हा सन्मान असल्याची भावना त्यांच्या सर्व समूहामध्ये आहे. 

श्री. गुरुनाथ तिरपणकर एक चांगले सहयोगी, मितभाषी अजातशत्रू असेलेल व्यक्तिमत्व आहे. आपल्या संघटन कौश्यल्याच्या आधारे त्यांनी सर्वसामान्य नारिकापासून उच्चपदस्थ अधिकारी वर्गापर्यंत आपले चंगले स्नेहसंबंध सांभाळले आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकारिणीमध्ये प्रमुख पदाधिकारी म्हणून ते कार्यभार सांभाळत असताना त्यांच्यावर आता आणखी एका मोठ्या ऑर्गनायझेशनची जबाबदारी आली आहे आणि ती जबाबदारी ते समर्थपणे निभावतील अशी त्यांच्या कार्याची ख्याती आहे. 

त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments