Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

डॉ.अथर्व चं.रोडे एम् .डी. (मेडीसिन)परीक्षा उत्तीर्ण. तळ्याच्या इतिहासात डॉ.होवून आणखी एक शिरपेचात रोवला तुरा.




तळा-किशोरपितळे-

(प्रतिनिधी)

 

तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांचा चिरंजीव अथर्व  एम्.डी डॉक्टर (मेडीसिन)परीक्षा उत्तीर्ण झाला.त्याने तळ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरून शिरपेचात तुरा रोवला आहे. घराण्याचे नाव गावाचे उज्वल केले आहे.तळा तालुक्याचे महाराष्ट्रातच्यावैद्यकीय क्षेत्रात लिहून ठेवले आहे डॉ.अथर्व लहानपणापासून हुशार होता त्याचे प्राथमिक शिक्षण गो.म.विद्यामंदिर तळा येथे घेऊन माध्यमिक शालांत परीक्षेत पहील्या क्रमाकांने उत्तीर्ण झाला होता पुढील १२वी पर्यंत चे शिक्षण पुणा व एम् बी बी एस ,व एम्.डी शिक्षण सेवाग्राम वर्धा येथे घेऊन एम्.डी.परीक्षा पहिल्याच प्रयत्नातउत्तीर्ण झाला त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

तरूणासाठी प्रेरणा स्थान:-डॉ.अथर्व यांच्याशी संपर्क साधला असता जिध्द चिकाटी, प्रचंड मेहनत असेल तर आकाशाला गवसणी घालू शकतो. हे सिद्ध करून दाखवले आहे. आर्थिक पाठबळ असले तरी जागेपणी बघीतलेले स्वप्न साकार करण्यासाठी जिध्द होती. जिध्द आणी चिकाटी पुढे यश लांब नसते हा युवा पिढी समोर आदर्श निर्माण केला आहे.

"गावाकडे चला गावाचा विकास करा"

पुढील शिक्षण पूर्ण झाल्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधीचा "गावाला चला गावाचा विकास करा" हा नाराअवलंबून जन्म भूमीच्या गोरगरीब जनतेची सेवा करणार असल्याचा मानस व्यक्त केला.डॉ.अथर्व यांचे नामदेव शिंपी समाजबांधव,नातेवाईक, मित्रमंडळी व सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Post a Comment

0 Comments