✍️ दिलीप करकरे ✍️
माणगाव, रायगड
7208708456
श्रीवर्धन : शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे खरे साधन असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत युवा प्रतिष्ठान रायगड यांच्या वतीने रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी धारवली गाव, तालुका श्रीवर्धन येथे शैक्षणिक उपक्रम २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
युवा प्रतिष्ठान रायगड ही संस्था सन २०२२ पासून सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून धारवली येथे शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी गावातील तसेच मुंबईतील प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमास आयोजक श्री. गणेश निर्मळ, उपाध्यक्ष श्री. विशाल सावंत, विभाग संघटक प्रमुख श्री. अमित पवार, तसेच कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
यावेळी धारवली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ चाळके, उपाध्यक्ष श्री. विलास कडू, सेक्रेटरी श्री. निलेश घोलप, प्रमुख सल्लागार श्री. सुजितभाई तांदळेकर, श्री. केशव पवार, माजी शाखाप्रमुख श्री. दत्ताराम पवार, श्री. संतोषभाई जगताप, श्री. मयूर पवार यांच्यासह गाव मंडळ व मुंबई मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी, त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन मिळावे आणि समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणासाठी आपापल्या परीने योगदान द्यावे, हा संदेश देण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. अमर शंकर खेरटकर यांनी आपल्या अभिप्रायातून सांगितले की, समाजसेवा ही केवळ मोठ्या उपक्रमांपुरती मर्यादित नसून छोटे-छोटे समाजोपयोगी उपक्रमही समाजाच्या विकासात मोठी भूमिका बजावतात. आपल्या गावातील गरजू विद्यार्थी, नागरिक आणि समाजघटकांसाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
“आपण ज्या मातीत वाढलो, त्या मातीचे आणि आपल्या गावाचे नाव आपल्या कार्यातून उज्ज्वल व्हावे, हीच खरी समाजसेवा,” या भावनेतून युवा प्रतिष्ठान रायगडच्या माध्यमातून सर्वांनी सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गाव मंडळ, मुंबई मंडळ तसेच युवा प्रतिष्ठान रायगडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्यामुळे हा शैक्षणिक उपक्रम उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून यशस्वीपणे पार पडला.

Post a Comment
0 Comments