Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

विसर्जन सोहळ्यात व्यस्त असतानाही दानशूर माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा मध्यरात्री मदतीचा हात.




चिमुकल्या छत्रपती गजेला यांच्या पार्थिवासाठी ₹१० हजारांची तातडीची मदत; गाजावाजा न करता जपली माणुसकी.


मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी:- सिरोंचा येथील अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकल्या छत्रपती गजेला यांच्यावर नागपूर मेडिकल येथे उपचार सुरू होते. मात्र २४ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता उपचारादरम्यान त्यांचे दुर्दैवी निधन झाले. चिमुकल्याच्या निधनाने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातच नागपूरहून सिरोंचा येथे पार्थिव नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याचे मोठे संकट कुटुंबीयांसमोर उभे राहिले.


याच वेळी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज हे अहेरीचा राजाच्या भव्य विसर्जन सोहळ्यात व्यस्त होते. मात्र नागपूर येथील आरोग्यदूत योगेश वासुदेवराव नासरे यांनी रात्री १ वाजता फोन करून परिस्थिती सांगितली. विसर्जन सोहळ्याच्या गडबडीतही राजेंनी फोन उचलला, परिस्थिती समजून घेतली आणि क्षणाचाही विलंब न करता मदतीचा निर्णय घेतला.


पार्थिव सिरोंचा येथे नेण्यासाठी वाहनाच्या खर्चाकरिता राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी ₹१० हजारांची तातडीची आर्थिक मदत केली. दुःखाच्या काळात अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला या मदतीमुळे मोठा आधार मिळाला.


विशेष म्हणजे, मदत केली; मात्र त्याचा कोणताही गाजावाजा केला नाही. प्रसिद्धीपेक्षा गरजू कुटुंबाला आधार देणे महत्त्वाचे मानत मध्यरात्री केलेली ही मदत राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या दानशूर वृत्तीची आणि माणुसकीची प्रचिती देणारी ठरली.


संकटात मदतीला धावून जाणे, दुःखाच्या क्षणी आधार देणे आणि केलेल्या मदतीची प्रसिद्धी न करणे—यातून *दानशूर राजे* म्हणून राजे अम्ब्रिशराव महाराज यांची संवेदनशील बाजू पुन्हा समोर आली.


आरोग्यदूत योगेश वासुदेवराव नासरे यांनी या प्रसंगी राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे मनःपूर्वक आभार मानले.


चिमुकल्या छत्रपती गजेला यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

Post a Comment

0 Comments