अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी पालघर
7798185755
तलासरी, दि. २ सप्टेंबर २०२६ : वरवाडा येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा अपघात होऊन दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे तलासरी तालुकाध्यक्ष मा. श्री. विवेक करमोडा यांनी सासवंत येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, वरवाडा येथील विद्यार्थिनी कु. तनिषा फेसराडा हिची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.
यावेळी करमोडा यांनी डॉक्टरांकडून विद्यार्थिनीच्या उपचाराबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच मेडिकल सुप्रिटेंडन्ट डॉ. खंडेलवार यांची भेट घेऊन विद्यार्थिनीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी सुरू असलेल्या उपचारांबाबत चर्चा केली. त्यांनी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊन त्यांना धीर दिला.
वरवाडा येथे झालेल्या या अपघातात शासकीय आश्रमशाळेतील दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी आणखी एक विद्यार्थिनी वलसाड येथे उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
या भेटीप्रसंगी राज्य परिषद सदस्य श्री. सुरेश शिंदा, तालुका सरचिटणीस श्री. सुभाष हाडळ, सचिव श्री. पांडुरंग करमोडा, श्री. रमेश घुटे, श्री. छरीष रजक, श्री. दिनेश सावर, श्री. प्रमोद शिंदा आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments