अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी पालघर
7798185755
तलासरी :- तलासरी तालुक्यातील सूत्रकार-बेंडगपाडा येथे नवनिर्माण जनजागृती युवक मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त ३० ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकात्मता, सामाजिक एकजूट आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा निर्धार करण्यात आला.
बैठकीत गणेशोत्सवाच्या विविध नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गणेशमूर्तीचे स्वागत, मंडपाची व्यवस्था, पूजा-विधी, निमंत्रण, उत्सवादरम्यान आयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रम, तारपा, भजन आदी विषयांवर चर्चा करून गणेश भक्तांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
यासोबतच पाड्यातील विविध समस्या तसेच विकासाच्या प्रश्नांवरही बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकजूट आणि समाजाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणारा उपक्रम ठरावा, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस गावचे उपसरपंच चंद्रकांत दुमाडा, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप लीलका, सुभाष बारात, मंडळाचे पदाधिकारी दीपक बेंडगा, जेटू सातवी, रामदास राजड, अनिल लिलका, सुधीर लिलका, कमलेश, राजेश, पिंटू, इश्रम, संदीप, स्वप्नील, शिवाजी जांजर यांच्यासह १०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

Post a Comment
0 Comments