Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पोलिसांचा बंदोबस्तात छल्लेवाडा येथे कडकडत्या भरउन्हात काँग्रेसचे रस्तारोको आंदोलन यशस्वी. प्रशासनाकडून लेखी आश्वासन, उद्यापासून काम सुरू होणार.



मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

छल्लेवाडा : अहेरी तालुक्यातील गोलाकर्जी-रेपनपल्ली मुख्य मार्गाच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या धान रोवणी व रस्ता रोको आंदोलनाला अखेर यश आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात आज सकाळी १० वाजता छल्लेवाडा-कमलापूर दरम्यानच्या खड्ड्यात आंदोलन करण्यात आले.यावेळी आजी - माजी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते,ग्रामस्थ,शेतकरी व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनाची दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.अधिकाऱ्यांनी उद्यापासून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.तसेच गोलाकर्जी ते राजाराम पर्यंत सिमेंट रोड आणि राजाराम ते कमलापूर नवीन डबरीकरण तसेच रेपनपल्ली ते कमलापूर सिमेंट रस्त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्याचे आश्वासनही दिले.

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर डॉ.अजय कंकडालवार यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. 

जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाला आम्ही जागे केले आहे. उद्यापासून काम सुरू नाही झाले तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू,असा इशारा डॉ.कंकडालवार यांनी दिला.या वेळी प्रमुख उपस्थित सेवा निवृत्ती साहय्यक हणमंतू मडावी,राजेश दुर्गे,माजी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, अहेरी माजी सभापती सुरेखा आलाम,माजी जि. प. सदस्य अजय नैताम,सरपंचा लक्ष्मी मडावी, राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कंबगौनीवार,माजी ग्रामपंचायत सदस्यगण इंदू पेंदाम, विलास सिडाम, गंगाराम मडावी, विलास बोरकर, रामप्रसाद मुजमकर, दासू कांबळे, गुलाब देवगडे, प्रमोद दुर्गे, लक्ष्मण जनगम, नामदेव पेंदाम, रमेश पोरतेट, मुत्ताजी पोरतेट, राकेश सडमेक, हणमंतु ठाकरे, संतोष लेंडगुरे, नारायण लेंडगुरे,व परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments