मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809.
राजाराम (खां) ता. अहेरी, जि. गडचिरोली येथील गावाची प्रख्यापन करून गावाची नकाशा उपलब्ध करून देण्यात यावी
मौजा - राजाराम हे महसूल गाव असून साजा क्र. २४ येत असून संपूर्ण क्षेत्र- १८२८.६४ हेक्टर आर असून इंग्रजाच्या काळातील नकाशा महसूल विभागाकडे उपलब्ध आहे. मात्र दर ३० वर्षानी सर्वे करून नविन नकाशा उपलब्ध करून देण्यात येते. मात्र ग्रा.पं. राजाराम मध्ये आज पर्यंत स्वातंत्राचे ७५ वर्षा अमृत महोत्सव साजरी होत असतांना इंग्रजाच्या काळातील नकाशानुसार शेतकऱ्यांना कास्तकाराने लागत आहे. हे करत असतांना सुद्धा नकाशा उपलब्ध नसल्याने पोट हिस्सा, फेरफार व इतर महसूल कार्य व कृषि विभागाचे योजनेचे लाभ घेत असताना शेतकऱ्यां कडे नकाशा उपलब्ध नसल्याने योजनेचे लाभ घेता येथ नाही.
या बाबत तलाठी साझा क्र. 24 मधुन वरिष्ठ महसूल विभागांकडे वारंवार पत्र व्यवहार करूनही सदर बाबीकडे दुर्लक्ष केला जात आहे त्यामुळे म्हणून आपण जातीने लक्ष देऊन सदर गावाची प्रख्यापन करून नकाशा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या स्तरावरून आपल्याकडून पत्र व्यवहार करण्यात यावी.
अशी मागणी निवेदन देऊन ओबीसी तालुका अध्यक्ष अरविन्द परकीवार यांनी मुख्य सचिवाकडे केले असून तसेंच या परिसरातील खांदला ते चिरेपली मार्ग दुरुस्ती करण्याची मागणी केले आहे.या वेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष विकास तोडसाम तसेच चिरेपल्ली गावातील नागरिक तुकाराम आलाम,भगवान मडावी, गुरूदास सोयाम, नारायण आत्राम, मनोज पेंदाम, नारू पेंदाम, रवि सोयाम, राजू आलाम इत्यादी नागरिक उपस्थित होते.
.......
.....
उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments