Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

अहेरी -आलापल्लीत महाबोधी महाविहाराचा खरा इतिहास”वर व्याख्यान



व्येकटेश चालुरकर 

तालुका प्रतिनिधी अहेरी 

9209982212


वर्षावास प्रवचन मालिकेतील बाराव्या पुष्पात प्रा.प्रमोद मेश्राम  यांचे प्रभावी प्रवचन


अहेरी. तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा, गडचिरोली (दक्षिण)  समिती, आलापल्ली,भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा, अहेरी,महामाया महिला मंडळ आलापल्ली.बहुउद्देशीय महिला मंडळ, आलापल्ली., यशोधरा महिला मंडळ अहेरी व बोधिसत्व बहुउद्देशीय विकास मंडळ अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने संघमित्रा बौद्ध विहार आलापल्ली तसेच धम्म दीक्षाभूमी टेकडी बुद्ध विहार अहेरी येथे  आनंदमय वातावरणात वर्षावास प्रवचन मालिकेतील बाराव्या पुष्पात प्रा.प्रमोद मेश्राम, आलापल्ली यांचे प्रभावी प्रवचन सोहळा आलापल्ली येथे सकाळी तर अहेरीत सायंकाळी पार पडला.

  कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही ठिकाणी आदर्शांची पूजा,बुद्धवंदना,त्रिशरण व पंचशील ग्रहण व भीमस्मरनाणे करण्यात आली.

आलापल्लीत  अंकिता अमोल दुर्गे व अहेरीत सेनि. वनपरीक्षेत्राधिकारी जयंत गजभिये यांनी सुंदर भीमगीताने सुरुवात करून वातावरण  प्रसन्न केले.

यानंतर प्रवचन मालिकेतील बारावे पुष्प "महाबोधी महाविहाराचा खरा इतिहास" या विषयावर  प्रा. प्रमोद दत्तूजी मेश्राम यांनी  इसवी सन पूर्व ते इसवीसन पर्यंत चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी केलेली महाविहाराची पायाभरणी,गुप्त सम्राट यांनी केलेला जिर्णोद्धार व ब्रिटिश इतिहास संशोधक अलेक्झांडर कमिंग हम यांनी केलेला पुनरुत्थान यावर इत्यंभूत अभ्यासपूर्ण विवेचन केले. व बोधगया टेम्पल अक्ट 1949 नुसार विहाराचे व्यवस्थापन सुरू असून महाबोधी महाविहार मुक्ती लढा अधिक मजबूत करण्याचे उपस्थित त्यांना आवाहन केले.

रुचकर अशा नाश्त्याचे दान आलापल्लीत इंदिरा करमे तर अहेरीत प्रवचनकाराच्या परिवार कडून देण्यात आले.

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन आलापल्ली व अहेरी येथे शकुंतला दुर्गम आणि अमोल दुर्योधन यांनी तर कार्यक्रमाचे आभार  आलापल्लीत राजेश्वर दुर्गे  व अहेरीत ओमप्रकाश गर्गम यांनी केले.

प्रवचनकार, संचालणकर्ते, आभार व नास्ता दाणकर्त्यांना आयोजककडूनमहापुरुषाची पुस्तके भेट देण्यात आली.

या प्रवचन मालिकेला अहेरी,आलापल्ली, नागेपल्ली येथील बहुसंख्य उपासक, उपासिका उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यात भारतीय बौद्ध महा. व ईतर मंडळाचे  मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments