व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी सिरोंचा तालुक्यातील रंगयापल्ली येथील बालकांवर ग्रामिण रुग्णालय सिरोंचाच्या डॉक्टरनी इंजेक्शन दिल्याने त्यांचा मृत्यु झाला व सिरोंचा पोलिसांनी रिपोर्ट घेतली नाही उलट येथील पोलीसांनी तक्रार केल्यास मारहान केली त्यामुळे संबंधित डॉक्टर नर्स व सिरोंचाचे ठाणेदार व पोलीसाची योग्य चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन मादगी समाज संघटना संस्थापाक -कार्याध्यक्ष डॉ समय्या पसुला ,व रिपब्लिकन पार्टीचे नेते गोपाल रायपुरे रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर सर् ,माजी जि.प अध्यक्ष डॉ समय्या पसुला मुलाचे वडील मोहन चेन्नुरी सहीत एका शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी आशिष वानखेडे व जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली यांचेकडे निवेदनाद्वारे केली. मोहन मल्लया चेन्नुरी रंगयापल्ली यांच्या मुलाला ग्रामीण रुग्णालय सिरोंचाच्या चंमु नी तपासणी करीता वडीलासहीत नेले हसत खेळत असणाऱ्या मुलाला कोणताही त्रास नसतांना संबंधित डॉक्टरच्या सल्याने नर्सने इंजेक्शन दिले असता पाच मिनिटातच मुलाचा मृत्यु झाला. मुलाच्या आई वडील सिरोंचा पोलीस ठाणे येथे रिपोर्ट देण्याकरिता गेले असता संबंधित ठाणेदारांना रिपोर्ट घेतला नाही उलट मृत्यु मुलांच्या दुखात असलेल्या वडीलाला येथील एका पोलिसांनी थोबाडीत मारली व प्रेताचे शवविच्छेदन करण्याकरीता सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविले. नंतर रिपोर्ट देऊनही सदर प्रकरण पोलिसाकडून दडपण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.मुलाच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्या ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथील डॉक्टर नर्स व पोलीस स्टेशन सिरोंचा चे ठाणेदार येथील एक पोलीस शिपाई हेच मुलाच्या मृत्युला जबाबदार असून संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अश्या मागणीचे निवेदन मादगी समाज संघटना कार्याअध्यक्ष डॉ समय्या पसुला ,वा रिपाईच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी गडचिरोली व जिल्हा पोलिस अधीक्षक गडचिरोली यांचेकडे केली. निवेदन देतांना शिष्ठमंडळात मादगी समाज संघटनेच्या नेते तसेच आरपिआयचे नेते गोपाल रायपुरे आरपिआय चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर माजी जि.प अध्यक्ष डॉ समय्या पसुला वडील मोहन चेन्नुरी आई गंगु चेन्नुरी आदि उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments