Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

वैरागडमध्ये वाघाचा धुमाकूळ दोन म्हशींसह शेळीचा बळी



प्रमोद चिंतलवार तालुका प्रतिनिधी गडचिरोली 

वैरागड : येथील पद्दमारा जंगल परिसरात वाघाने दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी गोहनातून परत येत असलेल्या शेतकऱ्यांच्या दोन म्हशी आणि एक शेळीवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. 

नेहमी प्रमाणे वैरागड येथील शेतकरी सुरेंद्र बावणकर आणि राजेश बावणकर यांनी सकाळी आपल्या म्हशी चरईसाठी गोहनात सोडल्या. गोहन परत येत असताना पद्दमारा कक्ष क्रमांक ७४० जंगल परिसरात वाघाने म्हशींच्या मानेवर आणि मागील बाजूस हल्ला केला यात वैरागड येथील शेतकरी सुरेंद्र बावणकर यांची एक आणि राजेश बावणकर यांच्या मालकीच्या दोन म्हशी जागीच ठार झाल्या त्याचप्रमाणे याच परिसरात एक शेळी ठार झाल्याचे आढळे असल्याची माहिती मिळालवाघाच्या हल्ल्यात म्हशी ठार झाल्याने  एका म्हशींची अंदाजित किंमत ५०,००० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. वन विभागाने मृत जनावरांसाठी त्वरित योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पशुपालक करत आहेत. या घटनेमुळे वैरागड परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

घटनेची माहिती मिळताच आज दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी वैरागड वन क्षेत्र सहाय्यक गजबे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक कावेरी बिस्वास आणि वन मजूर अंताराम कांबळे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि वाघाच्या देखरेखीसाठी कॅमेरे लावण्यात आले.  दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी वैरागड येथील आनंदराव बावनकर यांच्या बैलावर चुनबोडी जंगल परिसरात वाघाने हल्ला करून जखमी केले होते. वारंवार होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे वैरागड येथील शेतकरी आणि पशुपालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments