Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

महिला-बालकल्याण योजनांना गती द्या; बालसंरक्षण यंत्रणा अधिक सक्षम करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात महिला व बालकल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ वेळेत पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.

जिल्हा बाल संरक्षण समिती, चाइल्ड हेल्पलाइन, बालकल्याण समिती आणि विविध बालसंरक्षणविषयक कामांचा आढावा घेताना प्रलंबित दत्तक प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यावर त्यांनी भर दिला.

कोविड काळात अनाथ झालेल्या पात्र बालकांना PM CARES for चिल्ड्रेन तसेच राज्य शासनाच्या मुदत ठेव योजनेचा लाभ निर्धारित वयोमर्यादा पूर्ण होताच वेळेत मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बालगृहातील मुलींना आधुनिक व रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देणे, तसेच अनाथ व दिव्यांग बालकांना प्रायोजकत्व योजनेचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी अतिरिक्त उद्दिष्टाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

बालविवाह प्रतिबंधासाठी प्रभावी समुपदेशन आणि विभागीय समन्वयावर विशेष भर*देण्यात आला. शाळाबाह्य व सातत्याने गैरहजर राहणाऱ्या मुलींची गावनिहाय माहिती घेऊन त्यांच्याशी व पालकांशी संपर्क साधत शिक्षण, बालविवाहाचे दुष्परिणाम आणि उपलब्ध शासकीय योजनांबाबत समुपदेशन करण्याचे निर्देश देण्यात आले.

आरोग्य, पोलीस, महिला व बालविकास आणि शिक्षण विभागांनी समन्वयाने कार्य करत बालविवाह रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्याचे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments