प्रमोद एन. चिंतलवार
तालुका प्रतिनिधी गडचिरोली
मो. नं. 9405133420
धानोरा : ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, धानोरा येथील गुणवंत विद्यार्थिनींचा मा. शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत इयत्ता आठवीतील कु. हिरकन्या सोनुले व कु. ईशीका सरकार या विद्यार्थिनी पात्र ठरल्या. त्यांच्या या यशाची दखल घेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थिनींमध्ये गुणवत्ता, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक परीक्षांची जिद्द निर्माण करण्यासाठी अशा विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेतही भर पडली आहे.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा शिंपी तसेच मार्गदर्शक शिक्षिका प्रितीनंदा बोदलकर, कीर्ती उंदीरवाडे, सुलोचना गाडगे, मंजुषा कुथे व कीर्ती फुंडे यांनी गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थिनींनाही शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळत आहे.

Post a Comment
0 Comments