Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

नॉर्थ युरोप मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्रातून डॉ.निलेश राणे यांची निवड.

 



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

मो. 8208166961



 *मुंबई :* ट्युनिस देशातील गॅमर्थ शहरातील वेर्डी ट्युनिस बीच रिसॉर्ट येथे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स (लंडन) यांच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्रातून नाशिकचे डॉ.निलेश राणे यांची निवड करण्यात आली असून, त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.


या परिषदेत युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातील प्रतिष्ठित व्यक्ती, विविध देशांचे शिष्टमंडळे तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. जागतिक स्तरावरील संबंध व सहकार्य अधिक दृढ करणे, नाविन्यपूर्ण कल्पनांची देवाणघेवाण, जागतिक नेतृत्व, मानवतेचा विकास आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक भागीदारी यावर परिषदेत विचारमंथन होणार आहे.


तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जागतिक व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून डॉ.निलेश राणे यांची झालेली निवड ही राज्यासाठी गौरवाची बाब मानली जात असून, त्यांच्या या आंतरराष्ट्रीय सहभागाबद्दल विविध क्षेत्रांतून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Post a Comment

0 Comments