Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

शिक्षिका शैलेजा गोरेकर यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.



मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी :- गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  शैलजा मल्लूजी गोरेकर, विषय शिक्षिका, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरी, पंचायत समिती अहेरी यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.


शैलेजा गोरेकर यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे समर्पितपणे कार्य करत विद्यार्थीकेंद्रित, तंत्रस्नेही व नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. मूल्यवर्धन उपक्रमांत गडचिरोली जिल्ह्याच्या महिला SRG म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरीय विविध प्रशिक्षणांमध्ये संसाधन व्यक्ती म्हणून कार्य करून शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.


भावरागड तालुकास्तरीय उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले असून, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा बोरीला “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमांत पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, लेखन व साहित्यनिर्मिती, तसेच विविध प्रशिक्षण सत्रांचे आयोजन यामधूनही त्यांनी विशेष योगदान दिले आहे.


त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण विभाग, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


– अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments