मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
मो. 8208166961
एटापल्ली : पंचायत समिती परिसरातील मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेले “विकास सर्व्हिस स्टेशन” शासकीय पेट्रोल पंप तातडीने सुरू करण्यात यावे, तसेच तो कोणत्या निश्चित तारखेला सुरू होणार याची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
पंचायत समिती परिसरातील या पेट्रोल पंपावर नागरिक, शासकीय कर्मचारी, शेतकरी, वाहनधारक तसेच विविध शासकीय कामांसाठी येणारे नागरिक मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. हा शासकीय पेट्रोल पंप नागरिकांच्या विश्वासाचा असून एटापल्लीतील नागरिकांच्या मनात त्याच्याबद्दल विशेष स्थान आहे. मात्र, हा पेट्रोल पंप अनेक महिन्यांपासून बंद असल्याने पेट्रोल व डिझेलसाठी नागरिकांना दूरवर जावे लागत असून त्यांचा वेळ व आर्थिक खर्च वाढत आहे.
पेट्रोल पंप बंद असण्याचे नेमके कारण काय आहे, तो सुरू करण्यासाठी आतापर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे आणि कोणत्या निश्चित तारखेपर्यंत पंप सुरू केला जाणार आहे, याची स्पष्ट लेखी माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी CPIने केली आहे.
यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, CPI; कॉ. सुरज जककुलवार, जिल्हा सदस्य तसेच तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले “जनतेच्या सोयीसाठी असलेली आणि नागरिकांच्या विश्वासाचे स्थान असलेली शासकीय सुविधा अनेक महिने बंद राहणे योग्य नाही. प्रशासनाने तातडीने आवश्यक दुरुस्ती व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पेट्रोल पंप सुरू करावा आणि निश्चित तारीख लेखी कळवावी. मागणीची दखल न घेतल्यास जनतेच्या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.”
.jpg)
Post a Comment
0 Comments