Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

मेडपल्ली येथे मत्स्य पालन प्रशिक्षण संपन्न; 87 शेतकऱ्यांचा सहभाग.



मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9520751809.

मेडपल्ली:-  (गोटूल) ता. अहेरी, दि. 5 - BAIF संस्थेच्या अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पांतर्गत मेडपल्ली गोटूल  येथे आज मत्स्य पालन व संगोपन व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या प्रशिक्षणास प्रमुख मार्गदर्शक म्हणून BAIF गडचिरोली कार्यालयाचे प्रशिक्षक अजय सहारे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना  अतुल डोर्लीकर यांनी केली. यावेळी त्यांनी BAIF ची माहिती , अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प ची ओळख, कामे सांगण्यात आले.

या प्रशिक्षणात  सहारे यांनी बोडीची निवड व पूर्वतयारी, रोहू, कतला, ग्रास कॉर्प, मृगल या माशांच्या जातींची निवड, भाताचा कोंडा, सरसों ढेप, शेंगदाणा ढेप यापासून खाद्य निर्मिती, पाणी व्यवस्थापन, रोग नियंत्रण तसेच मत्स्य व्यवसायातील अर्थशास्त्र व नोंदी कशा ठेवाव्यात यावर सविस्तर माहिती दिली. तसेच बोडीवर मचाण उभारून पोल्ट्री व मत्स्य पालन एकत्र केल्यास होणारा दुहेरी नफा याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. शासकीय मत्स्य विभागाच्या विविध योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली.


यावेळी धान पिकावरील रोग ओळख व व्यवस्थापन यावर SPO  नितेश गलबले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास TL  मंगेश कुडे, GI  सायली मेश्राम, सहकार्य प्रेरक बाबुराव तलांडी, लालसू तलांडी, संजय आत्राम यांच्यासह एकूण 87 शेतकरी (82 पुरुष, 05 महिला) उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी BAIF चे प्रेरक यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments