Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

राष्टीय युवा पत्रकार संघटनेच्या जिल्हा सहसचिवपदी महेश अलोणे यांची निवड.



राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मधुकर गोंगले यांच्या प्रमुख उपस्थिती कार्यक्रम पार.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी :- अहेरी : राष्टीय युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जिल्हा सहसचिवपदी अहेरी येथील पत्रकार महेश अलोणे यांची निवड करण्यात आली आहे.राष्टीय युवा ग्रामीण पत्रकार संघटनांच्या वतीने झालेल्या बैठकीत एकमताने ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

महेश अलोणे हे गेल्या काही वर्ष्यापासून अहेरी व परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, वीज तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडत आहेत. दुर्गम व ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान केले आहेत.

पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मांडण्याबरोबरच शासनाच्या विविध योजना, विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी वृत्तांकन केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्टीय युवा पत्रकार संघटनेच्या गडचिरोली जिल्हा सहसचिवपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या निवडीबद्दल अहेरी तसेच जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मित्रपरिवाराकडून महेश अलोणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील पत्रकारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.या वेळी राष्टीय युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर गोंगले, जिल्हा महासचिव जावेद अली, जिल्हासल्लागार भीमराव वनकर, मोहसिन शेख, इन्नू पठाण इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments