मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
मो. 8208166969
चंद्रपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की 29 सप्टेंबर 2026 ला चंद्रपूर येथे जाहीर पक्ष प्रवेश मोठया थाटात संपन्न झाला हा पक्ष प्रवेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाति विभाग चा वतिने सौं.सुनिता राजु गोवर्धन चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष अनुसूचित विभाग कॉंग्रेस कमिटी यांच्या हस्ते राजेश्वर सोदारी यांचा पक्ष प्रवेश घेण्यात आला
या पक्ष प्रवेशासाठी चंद्रपूरातील काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
हा पक्ष प्रवेश सौं.सुनिता राजु गोवर्धन चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष अनुसूचित विभाग कॉंग्रेस कमिटी यांच्या कार्यालयात घेण्यात आला, पक्ष प्रवेश केल्यानंतर राजेश सोदारी यांनी आपले मत व्यक्त करत मी आज काँग्रेस पक्षात प्रवेश करून खुप आनंदी झालो आहे आणि समोर मला सर्वसामान्य जनतेच्या समस्या व न्याय हक्काच्या लढा देण्यासाठी वरिष्ठ माझ्या पाठीशी खंभीर पणे उभे राहतील अशी अशा व्यक्त केली.
सौं.सुनिता राजु गोवर्धन चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष अनुसूचित विभाग कॉंग्रेस कमिटी यांनी यावेळी म्हटले की मी अगोदर पासून सर्व सामान्य जनेतेच्या प्रश्नांना घेऊन लढत आलो आहे आणि समोर असाच लढा सुरु ठेवणार व काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता चंद्रपूर च्या कानकोपऱ्यात बसविण्याचा सदैव प्रयत्न करत राहणार जेणेकरून गोरगरीब जनेतेच्या प्रश्नांना आपला कार्यकर्ता न्याय हक्कासाठी लढा देईल पुढे सुनिताताई यांनी म्हटले की कार्यकर्ता हा कॉग्रेस पक्षाचा कणा आहे आणि मी व काँग्रेस पक्षाचे मोठे पदाधिकारी सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंभीरपने उभे आहोत. यावेळी मोठया प्रमाणात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व बाबुपेठ वासियांनी आपापली उपस्थिती दर्शवली होती.

Post a Comment
0 Comments