मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
कुरखेडा :दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शासन मान्यता असलेल्या नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालय देऊळगाव येथे, भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले व त्यांची जयंती साजरा करण्यात आली. वाचन संस्कृतीचे महत्व जाणून देऊळगाव येतील भास्कर खुणे न चुकता दररोज वाचनालयात येऊन वृतपत्र वाचत असतात. आणि आजच्या पिढीला वाचनाचे महत्व व फायदे पटवून देतात त्यांचे हे, अनमोल विचार, कार्य व वाचनाप्रती असलेली आवड बघून नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संतोष ठलाल यांनी पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ देऊन त्यांचा वाचनालयाच्या वतीने सत्कार केला. सोबतच साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी सुद्धा दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यावेळी उपस्थित असलेले देऊळगाव येतील प्रतिष्ठित नागरिक मंगेश गावळे, श्रावण ठलाल, पुर्णाबाई ठलाल, राजू ठलाल सत्कारमूर्ती भास्कर खुणे, विद्या,विकास हायस्कूल आणि जि.प.प्रा.शाळा देऊळगाव येतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी दोन्ही महापुरुषांना अभिवादन केले.

Post a Comment
0 Comments