Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

राज्यातील युवा प्रेरणास्रोत डॉ.निलेश राणे यांची एकाच वेळी दोन राष्ट्रीय विक्रम बुकमध्ये नोंद.



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

मो. 8208166961


मुंबई : - राज्यातील युवा प्रेरणास्रोत डॉ. निलेश राणे यांच्या सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या कार्याची रिपब्लिक बुक ऑफ रेकॉर्ड आणि इनक्रेडिबल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन राष्ट्रीय विक्रम बुकमध्ये एकाचवेळी नोंद करण्यात आली आहे.


गेल्या ९ वर्षांपासून ग्रामीण तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील ४,००० हून अधिक खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांमध्ये मार्गदर्शन करून त्यांना क्रीडा क्षेत्रात योग्य दिशा देण्याचे कार्य डॉ.राणे यांनी केले आहे.


या सातत्यपूर्ण कार्याची दखल भारतासह इंग्लंड आणि अमेरिका येथील संबंधित संस्थांकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, त्यांच्या कार्याची विविध विक्रम नोंद आणि सन्मान करण्यात आला आहे.


सामाजिक बांधिलकी आणि क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची दोन राष्ट्रीय विक्रम बुकमध्ये एकाचवेळी झालेली नोंद ही डॉ.निलेश राणे यांच्या कार्याची विशेष दखल मानली जात आहे.

Post a Comment

0 Comments