Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

दिवाणी व फौजदारी न्यायालय, राजुरा




'समान काम, समान वेतन' साठी न्यायालयीन कर्मचा-यांचा काळया फिती

लावून निषेध

 

संतोष मेश्राम 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

मो.  9923497800


राजुरा :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की राजुरा येथील माननीय उच्च न्यायालयाचे कर्मचा-यांना जी वेतन वाढ दिलेली आहे त्या अनुषंगाने समान काम समान वेतन या धोरणानुसार दुय्यम न्यायालयातील कर्मचा-यांना सुध्दा वेतन वाढ लागू करावी. यासंदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालयाने गठित केलेल्या विशेष समितीने दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी शासनास सादर केलेल्या अहवालातील शिफारशीच्या अनुषंगाने ही मागणी करण्यात आलेली होती. परंतु आजतागायत 20 महिण्याचा कालावधी उलटुन सुध्दा शासनाकडुन कोणताही शासन आदेश निर्गमीत करण्यात आला नाही.


माननीय उच्च न्यायालयाचे कर्मचा-यांना जी वेतन वाढ दिलेली आहे त्या अनुषंगाने समान काम समान वेतन या धोरणानुसार दुय्यम न्यायालयातील कर्मचा-यांना सुध्दा वेतन वाढ लागू करावी. या करिता सर्व दुय्यम न्यायालयातील कर्मचारी यांनी शासनाचा निषेध म्हणुन दिनांक 16 ऑक्टोबर 2026 व दिनांक 17 ऑक्टोबर 2026 रोजी काळ्या फिती लावुन दिवसभर कामकाज केले व शासनाचा निषेध नोंदविला. त्या उपरांत ही मागणी मंजुर न झाल्यास दिनांक 05.11.2026 रोजी सर्व दुय्यम न्यायालयातील कर्मचारी सामुहीक रजा घेवुन शासनाचा निषेध नोंदविणार आहे. तसेच यानंतर देखील मागणी मंजुर न झाल्यास दिनांक 17.11.2026 पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व दुय्यम न्यायालयातील एकुण चौतीस हजार कर्मचारी बेमुदत संपावर जातील.


करिता सदरहु माहिती आपले वृत्तपत्रात देण्यात यावी.


(एस. भु. भारकर)


सहसचिव जिल्हा न्यायाल‌यीन कर्मचारी


संघटना, चंद्रपूर

Post a Comment

0 Comments