अहेरी येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठया उत्साहात साजरा.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी, दि. २० ऑक्टोबर २०२६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणलेली धम्मक्रांती अधिक गतिमान करण्यासाठी बुद्धांच्या समतावादी विचारांचा व्यापक प्रसार, धम्माचे आचरण आणि समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. टी. एस. कांबळे यांनी केले.
७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अहेरी येथील धम्मदीक्षा बुद्धविहारात आयोजित १८ व्या प्रवचनमालेत “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान कशी करावी?” या विषयावर ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. डॉ. कांबळे हे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, बामणी येथे कार्यरत आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांनी आपल्या आदर्शांसमोर सामूहिकरीत्या त्रिशरण व पंचशील ग्रहण करून केली. त्यानंतर मा. झाडे सर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या मंगलमय प्रसंगी मा. दुर्गे मॅडम यांनी बुद्धवंदनापर गीत सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपल्या व्याख्यानात प्रा. डॉ. कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेचे ऐतिहासिक महत्त्व, भारतीय समाजव्यवस्थेतील परिवर्तनाची आवश्यकता आणि बुद्धांच्या प्रज्ञा, करुणा व समता या मूल्यांचे महत्त्व विशद केले. धम्मक्रांती केवळ एका ऐतिहासिक घटनेपुरती मर्यादित न ठेवता ती व्यक्तीच्या विचारांत, आचरणात आणि सामाजिक व्यवहारात प्रतिबिंबित झाली पाहिजे. धम्माचा अभ्यास, नियमित धम्माचरण, नव्या पिढीमध्ये वैचारिक जागृती, महिलांचा सक्रिय सहभाग, संघटनात्मक बांधणी आणि सामाजिक समतेसाठी सामूहिक प्रयत्न या माध्यमांतून धम्मक्रांतीला

Post a Comment
0 Comments